महाराष्ट्र

वादग्रस्त दिलीप स्वामी जि.प. सीईओपदासाठी उत्सुक!

नांदेड,बातमी24ः नांदेड येथे अपर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना एका तलाठी महिलेशी असभ्य वर्तणुक केल्या प्रकारावरून दलित समाजातून दिलीप स्वामी व तहसीलदार डापकर यांच्याविरुद्ध असंतोषाची लाट उसळली होती. अशा घृणास्पद प्रकार केल्यानंतरही दिलीप स्वामी नांदेड जिल्हापरिषदेचे सीईओ म्हणून येण्यास उत्सुक दिसत आहेत. अशा अधिकार्‍यास जि.प. सीईओ म्हणून पालकमंत्री अशोक चव्हाण जिल्ह्यात बोलविणार काय? याकडे लक्ष असणार आहे.

अपर जिल्हाधिकारी केडरमधील 23 अधिकार्‍यांना आयएएस मानांकन बहाल करण्यात आले आहे.यात अपर आयुक्त दिलीप स्वामी यांचा सुद्धा समावेश आहे. देगलूर तहसील अंतर्गत तलाठी असलेल्या दलित महिलेचे लैंगिक शोषण केल्यानंतर सध्या हदगाव तहसीलदार असलेल्या जीवराज डापकर व तेव्हा नांदेड अपर जिल्हाधिकारी राहिलेल्या दिलीप स्वामी यांच्याविरुद्ध त्या महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता. हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते.

या प्रकरणात राज्य सरकारची मोठी बदनामी झाली होती.नंतर दिलीप स्वामी हे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात रुजू झाले होते. सध्या ते अपर आयुक्त पदावर कार्यरत आहेत. महिलेच्या छेडछाड प्रकरणावरून स्वामी यांना शिक्षा म्हणून दोन वर्षे उशिरा आयएएस मानांकन मिळाले. सामाजिक व प्रशासकीय पातळीवर बदनाम झालेले दिलीप स्वामी हे नांदेड जिल्हा परिषद सीईओ म्हणून येण्यासाठी वजन वापरत आहेत.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा सुरु केल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. कदाचित ते या दोन दिवसांच्या काळात अशोक चव्हाण यांची भेट सुद्धा घेणार असल्याचे समजते. वंचित फॅ क्टरमुळे लोकसभेत पराभवाचे तोंड पाहावे लागलेले अशोक चव्हाण यांनी दिलीप स्वामी यांना नांदेड सीईओ म्हणून आणल्यास दलित समाजातून रोष उफ ाळून येऊ शकतो. त्याचशिवाय स्वामी यांना ही दलित समाजाच्या रोषाला वेळोवेळी तोंड द्यावे लागू शकते. या सगळया पार्श्वभूमिचा विचार करता, अशोक चव्हाण हे दिलीप स्वामी यांना नांदेड सीईओ म्हणून संधी देतील ही शक्यता धुसर वाटते.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago