नांदेड, बातमीः 24ः– कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारी तीन महिन्यांच्या काळात एक हजार रुग्णांचा पल्ला गाठला आहे. तीन महिन्यांपूर्वी अर्थात दि. 22 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्णा पीरबुर्हाण नगर भागात सापडला होता. तर मृत्यूचा आकडयाने सुद्धा अर्धशतक पूर्ण केले आहे.
चार दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने 94 आकडा गाठला होता. त्यानंतर रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यानंतर 65, 51 व मंगळवारी 32 रुग्ण कोरेाना पॉझिटीव्ह आले आहेत.आज रोजी 134 अहवाल तपासण्यात आले. यामध्ये 97 अहवाल निगेटीव्ह तर 32 पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरेानाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 18 इतकी झाली आहे. तर नांदेड शहरातील आंबेडकर नगर भागात राहणार्या एका 27 वर्षीय तरूणाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध शासकीय रुग्णालय व कोविड सेंटर येथे उपचार घेणार्या 40 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये मुखेड 01, विष्णपुरी शासकीय रुग्णालय 01,बिलोली 03,पंजाब भवन 08,हदगाव 02, मुदेखड 05, देगलूर 05, असे चाळीस रुग्ण असून आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची सख्या 555 झाली आहे. तर उपचार घेत असलेले रुग्ण हे 411 झाले आहेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…