महाराष्ट्र

देगलूर पाेट निवडणुकीत काेविड लसीकरण दोन डाेस आवश्यक :-जिल्हाधिकारी इटनकर

नांदेड,बातमी24:-९० देगलूर-बिलाेली विधानसभा पाेट निवडणुक प्रक्रियेत, सामील उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी यांचे काेविड लसीकरण (दोन वेळा) असणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
नवरात्र, दसरा, दिपावली सणांच्या उत्सव प्रसंगी पाेटनिवडणूक असली तरी काेविड नियम आणि निवडणूक आदर्श आचारसंहिता याचे एकत्रित पालन सर्वांना करावे लागणार आहे . दि. १५ जानेवारी २०२१ राेजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार मतदारांना मतदानाचा हक्क राहील. मतदान केंद्रात येतांना मतदारांनी ११ पुराव्यापैकी काेणताही एक पुरावा आणल्यास मतदान करता येईल. असे जिल्हाधिकारी इटनकर यांनी या पत्रकार परिषदेत नमूद केले.
उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी एजंट यांनी काेविड लसीकरण करून घेतले पाहिजे यासह उमेदवारांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांना सांगितली.
नांदेड जिल्ह्यात १ जानेवारी २०२१ यावर आधारित २५ लक्ष ८१ हजार २५(२५८१०५५) मतदार आहेत, देगलूर मतदार संघात २ लक्ष ९४ हजार ३५(२९४०३५) मतदार आहेत काेविड १९ लक्षात घेता १ हजार मतदारांसाठी १ मतदान केंद्र यानुसार ४११ मतदान केंद्र मतदारांना उपलब्ध करण्यात येतील. अपंग मतदार संख्या १३३३ अाहे तर माजी आमदार खासदार स्वराज्य संस्था पदाधिकारी ११५ आहेत यांना काेणताही अडचण येणार नाही.मतदान आेळखपत्रे १०० टक्के उपलब्ध केली आहेत. देगलूर उपविभागीय अधिकारी हे निर्वाचन अधिकारी (R O) व तहसीलदार हे सहाय्यक निर्वाचन अधिकारी(ARO) असतील. बॅलेट मशीन, व्ही व्ही पॅटची एकवेळ तपासणी झाली आहे. नामनिर्देशन दाखल करणे व सर्व निवडणूक प्रक्रिया तहसील कार्यालय देगलूर येथे हाेईल असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
देगलूर-बिलाेली मतदार संघाची पाेटनिवडणूक आज जाहीर झाली आणि या निवडणूक प्रक्रियेची सुरूवात पत्रकार परिषदेपासून करीत असल्याचे जिल्हाधिकारी इटनकर यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
नियोजन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पाेलीस अधीक्षक शेवाळे उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांची उपस्थिती होती.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

2 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

2 months ago