महाराष्ट्र

जिल्हाधिकार्‍यांना वाळू माफियांचे तर पोलिस अधीक्षकांना बंदुकधार्‍यांचे आव्हान

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः नांदेड शहर हे अतिसंवेदनशील बनत चालले आहे. बंदुकधारी गुंडाचे वखार नांदेड शहर व भोवतलाचा परिसर आहे. या बंदुधकार्‍यांनी पोलिसांच्या नाकीदम आणला आहे.इकडे वाळू माफि यांनी महसूल विभागाच्या नाकावर टिचून कारभार चालविला आहे. त्यामुळे आजघडिला जिल्हाधिकार्‍यांना वाळू माफि यांचे तर पोलिस अधीक्षकांना बंदुकधारी गुंडांनी आव्हान निर्माण केले आहे.

नांदेड शहर बंदुकीच्या ढिगार्‍यावर उभे राहिले अशी परिस्थिती आहे. बंदुकींची तस्करी व विक्रीचा अनाधिकृत साठा केंद्र अशी या शहराची ओळख होत आहे. या बंदुकींचा के्रज आठरा ते पंचविशीमधील तरूणांमध्ये मोठा असून यातून संघटीत गुन्हेगारी,खून, लुटमार, अपहरण त्याचशिवाय बंदुकीच्या जोरावर व्यापार्‍यांकडून उखळली जाणारी लाखो रुपयांची खंडणी हा त्यातील भयावाहक चित्र आहे. या तापात येथील व्यापारी सुद्धा स्वतःला सुरक्षित मानू नाही लागला आहे. दुकानात बसणारा व्यापारी भितीच्या सावटता आहे. कधी कुठून गोळीबार सुरु होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नव्वदच्या दशकात मुंबई ज्या प्रमाणे अंडरवर्ल्ड तयार झाले होते. तसेच चित्र नांदेड सारख्या महानगरच्या शहरात तयार झाले आहे. या मागे अनेक पैलू असून त्यापर्यंत पोलिस जाण्याची हिमत करत नाहीत. घटना घडली, की कारवाई होते.मात्र बंदुक विक्रीची वखार होऊ पाहणारे नांदेड शहरात या बंदुका विक्रीय नेमक्या येतात कुठून या मुळापर्यंत पोलिस जात नसल्याचे सांगितले जाते. बंदुक विक्री थांबू शकत नाही, असे पोलिस खुद स्वतःहून खासगीमध्ये बोलताता. मग शहरातील गुन्हेगारी तरी कशी आणि कधी संपणार असा प्रश्न उपस्थितीत होतो.

आजघडिला पोलिसांसमोर असणारे मुख्य आव्हान हे बंदुकधारी गुंडगर्दी संपविण्याचे असून पोलिस मागच्या चार ते पाच वर्षांपासून त्यातून बाहेर आलेली नाही. यात पोलिसांनी केलेला एक एन्कांउटर व एकास गोळी घालून जायबंदी केली, हे दाखविण्यासारखे आहे. तसेच अनेकांना मोक्का सारखे कलम ही लावले आहे. ज्या प्रमाणे पोलिसांना बंदुकधार्‍यांचे तसेच महसूल प्रशासनासमोर वाळू माफि यांनी आव्हान दिले आहे. वाळूतून नगद पैसे कमविण्याचा मोठा व्यवसाय प्रत्येकाला हवाहवासा वाटू लागला आहे. त्यामुळे या व्यवसायात राजकीय पुढार्‍यांसह गुंडगर्दी करणारे लोकही भागिदार झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी नांदेड येथील नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांच्यावर वाळूमाफि यांनी केलेली मारहाण हे ताजे उद्ाहरण आहे. अशा प्रकारची मारहाण अधिकारी-कर्मचार्‍यांना होण्याचे नवे नाही, तसे प्रकार यापुढे ही वाढत राहणार. याचे कारण म्हणजे वाळूचा अनाधिकृतपणे व्यवसाय करणार्‍यांकडून महसूली व खाकीचे समान खिसा गरम धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांना वाळू माफि यांचे तर पोलिस अधीक्षकांना बंदुकधार्‍यांचे आव्हान उभे टाकले आहे.

 

 

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago