महाराष्ट्र

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

 

नांदेड,बातमी24:-
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथील परिसरात कृषी विभागाच्या विविध योजनांना प्रक्षेत्र भेट दिली.यावेळी त्यांनी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषद सीईओ वर्षा ठाकूर, कृषी विकास अधिकारी संतोष नांदरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुनील केंद्रेकर यांनी येथील बायोगॅस योजनेचा लाभ घेतलेल्या प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती कमलबाई आण्णाराव धोतरे यांच्या बायोगॅसची पाहणी केली. तसेच त्यांनी सामूहिक शेततळे व त्यामध्ये पोकरा योजने अंतर्गत केलेले मस्श्यपालन भेट दिली.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मोसंबी फळबाग , तुषार सिंचन, शेतातील सौर ऊर्जेवर आधारित शेतीपंप आदी बाबींची पाहणी केली.शेतकऱ्यांनी मत्स्यशेती ,रेशीमपालन , मधुमक्षिका पालन आदी .बाबी राबवून शेतीतील जोखीम कमी करून शेतीतून अतिरिक्त शाश्वत उत्पन्न वाढविण्याची गरज असल्याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर त्यांनी प्रगतशील शेतकरी श्री .वाघ यांचे शेतीला भेट देऊन सुधारित औजारे व रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरलेल्या हरभरा पिकाची पाहणी केली, यावेळी ते म्हणाले,की
सध्या शेतीमध्ये यांत्रिकीकरण करणे ही काळाची गरज आहे, त्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती होणे नसल्याचे मत त्यांनी मांडले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शरद कुलकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री .रविशंकर चलवदे , मा .उपविभागीय अधिकारी श्री. लतीफ पठान , तहसिलदार श्री .किरण तालुका कृषी अधिकारी श्री .सिद्धेश्वर मोकळे ,
गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago