नांदेड, बातमी24ः क्रिकेटच्या मैदानात षटकांपेक्षा अधिक धाव काढणेे म्हणजे धावांचा डोंगर पार करणे होय. असे आव्हान हे एकप्रकारे संघ व संघप्रमुखांपुढे आव्हान असते. कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी म्हणून त्या वेळी नुकतीच धुरा हात घेतलेल्या डॉ. विपीन इटनकर यांच्यापुढे होते. प्रशासकीय अधिकारी व कोरोना योद्धांच्या सहकार्याने हे आव्हान पैलत आले. कॅप्टन कुल याप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची कामगिरी गत वर्षात प्रशंसनीय राहिली आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांची बदली नांदेड झाल्यानंतर त्या वेळचे परभणी जिल्हाधिकारी शिवशंकर यांचे नांदेड जिल्हाधिकारी म्हणून आदेश निघाले. अत्यंक कडक शिस्तीचा अधिकारी येथील राजकारणी व राजकर्त्यांना परवडू शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या जिल्हाधिकारी म्हणून प्राप्त झालेले आदेश रद्द करण्यास शासनास भाग पडले. त्या जागी त्या वेळी लातूर सीईओ असलेल्या डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश शासनाने नांदेड जिल्हाधिकारी काढले.
नांदेड जिल्हाधिकारी म्हणून येताना राजकीय हस्तक्षेप पाहता, ते पूर्ण ताकदीने खुर्ची सांभाळतील की नाही, अशी शंका लोकांच्या मनात होती. परंतु डॉ. इटनकर यांनी दरम्यानच्या काळात आपल्या कामातून या खुर्चीचा मान नक्की उंचावला आहे. नांदेड जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्याच्या काही दिवसांमध्ये कोरोनासारख्या महामारीचे संकट उभे राहिले. सुरुवातीचा दीड महिना जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या नसल्यागत होती. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत गेले.
या काळात प्रशासनाने कोरोनाची परिस्थिती अंत्यत नीटनेटकी हाताळली. पंजाब, दिल्ली येथून आलेल्या यात्रेकरूंमुळे रुग्ण संख्या वाढत गेली. मात्र या भागात अत्यंत चोखपणे प्रशासनाने काम केले. यातून या भागातील जनजीवन पुन्हा सुरळीत झाले.लॉकडाऊनच्या काळात भूकबळी ठरू नये, यासाठी विविध सामाजिक संघटनासह शासनाचे अन्न-धान्य पोहचविण्याचा प्रयत्न अटोकाट केला. त्यामुळे जिल्ह्यात विपरीत परिस्थिती ओढावली नाही.
कोरेानाची परिस्थिती हाताळताना घरात किंवा कार्यालयात बसून आदेश देण्याचे काम न करता, स्वतः बाहेर पडून कोरेाना केंअर सेंटर तात्काळ कसे उभारता येतील, यावर लक्ष केंद्रीत केले. कोरोनाचा चाचण्याची संख्या व्यापक केली.खासगी रुग्णालयांकडून लुट होऊ नये, यासाठी समिती गठीत केली, कोरोनाचे संकट पूर्णपणे संपले नसले, तरी डॉ. इटनकर हे वॉच ठेवून असतात. त्यामुळे डॉ. इटनकर यांची काम करण्याची पद्धती ही कॅप्टन कुल अशीच राहिले आहे. त्यात तितकाच वेळोवेळी दरारा ही दिसून येतो.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…