नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संसर्गाने मागच्या 24 तासांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत 206 जण मृत्यूशी झुंज देत आहेत,तर रुग्णसंख्या 290 एवढी झाली आहे.
सोमवार दि.31 रोजी 1 हजार 328 जणांची चाचणी करण्यात आली. 959 अहवाल निगेटिव्ह तर 290 जणांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले. यात आरटी-पीसीआर चाचणीत 83 व अटीजनमध्ये 207 अहवाल आले आहेत.तर इकडे 189 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे,त्यामुळे आतापर्यत 4 हजार 558 जण कोरोनातुन मुक्त होऊन घरी परतले आहेत.तर 1 हजार 858 जण उपचार घेत आहेत.
194 जण हे एकट्या नांदेड शहरातील पॉझिटिव्ह आले. तर 28 जण हे एकट्या नांदेड ग्रामीण भागातील आहेत.
——-
11 जणांचा मृत्यू
उमरी तालुक्यातील वसंत तांडा येथील 85 वर्षीय पुरुष,मुखेड तालुक्यातील पसुर येथील 51 वर्षीय पुरुष,हदगाव येथील 85 पुरुष,मुखेड येथील 45 वर्षीय महिला,मग्नपुरा येथील 65 वर्षीय पुरुष,भोकर तालुक्यातील भोसी येथील 66 वर्षीय पुरुष, हदगाव तालुक्यातील तामसा येथील 56 वर्षीय पुरुष,गोकुळ नगर येथील 65 वर्षीय महिला,नांदेड शहरातील परवाना नगर येथील 65 वर्षीय पुरुष तसेच देगलूर तालुक्यातील सावरगाव येथील 55 वर्षीय असे 11 जण दगावले आहेत,त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा 229 एवढा झाला आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…