नांदेड, बातमी24ः अर्धा-एक तासात रॅपिड अॅटीजेन चाचणी अहवाल येत आहे. अशा तात्काळ अहवाल देणार्या पाच हजार किट नांदेड जिल्ह्यात उपलब्ध झाल्या आहेत. मात्र या किटच्या अहवालाबद्दल संशयित रुग्णांच्या मनामध्ये सांशकता आहे. अॅटीजन चाचण्याच्या चुकीच्या निष्कर्षामुळे अनेक राज्य धास्तावले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला या चाचणीच्या अहवालावर शंभर टक्के अवलंबून राहता येणार नाही.
आरटी-पीसीआर चाचण्यांचा अहवालास विलंब लागतो.त्यामुळे घरो-घरी जाऊन सुद्धा कोरोनाची चाचणी करण्यासाठी रॅपिड अॅटिजन चाचणीस सुरुवात करण्यात आली. या चाचणी सगळीकडे सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातत चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या सगळया पार्श्वभूमिवर चाचण्या वाढविण्यासाठी पाच हजार किट मागविण्यात ाले आल्या आहेत.
अॅटीजन किट या कोरेानाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णास, लक्षणे दिसणार्या संशयित रुग्णावर, रक्तदाब, मधुमेह, दमा व अतिताप तसेच अधिक जोखीममध्ये असलेल्या फ्रंटलाईनवर रुग्णांसाठी चाचणी घेतली जात आहे. अॅटिजन चाचणीत संसर्गाची लागण न झालेल्यांचे निदान होण्याचे प्रमाण वाढत आहे. या चाचण्यांच्या चुकीच्या अहवालावर अवलंबून न राहता आरटी-पीसीआर चाचणीच्या अहलावावर रुग्ण अवलंबून राहत आहेत. असे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडले आहे. ज्यांचे अहवाल अॅटीजन चाचणी निगेटीव्ह दाखविले, अशांना आरटी-पीसीआर चाचणीत कोरेाना पॉझिटीव्ह अहवाल आल्याचे समोर आले आहे.त्यामुळे प्रशाससनाला अॅटीजन चाचणीवर शंभर टक्के अवलंबून न राहता आवश्यकतेप्रमाणे कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी करणे महत्वाचे ठरणार आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…