महाराष्ट्र

पक्ष वाढीसाठी सर्व समाजाची मोट बांधावी लागेल:-बापूराव गजभारे

 

नांदेड,बातमी24:- मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता असलो,तर समाजकारण व राजकारणात सर्व जाती धर्माना सोबत घेऊन काम करत आलो आहे.पुढील काळात पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत सर्व जाती-धर्माचे लोक जोडण्याचा प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त पक्षाचे महासचिव तथा नगरसेवक बापूराव गजभारे यांनी केले. महासचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल ते पक्षाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद भरणे,उपाध्यक्ष संघरत्न खंदारे, जिल्हामहासचिव मोहन गर्दनमारे,जिल्हा संघटन सचिव उत्तम बनसोडे,संघटक सतिष पांडवे,शहराध्यक्ष साहेबराव सोनकांबळे,आकाश गजभारे ,सतिष बनसोडे,माधव गोडबोले,सुनिल तिडके,बाळासाहेब कठाळे,अदि कार्यरकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कार प्रसंगी बोलताना गजभारे म्हणाले, की प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांनी महासचिव म्हणून पक्षाचे काम करण्याची संधी देणे हे माझ्यासारखा चळवळीच्या सन्मान समजतो. धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष व संघटना एकत्र आल्या पाहिजेत. त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही काँग्रेससोबतची सुरुवातीपासून आहे.चळवळीचे काम करत असताना राजकीय सत्ता सुद्धा तितकीच महत्वाची आहे. सत्तेत सहभागी झाल्याशिवाय समाजाची प्रगती होत नाही. या महाआघाडी सरकारमुळे संघ-भाजप अजेंड्याला छेद बसला असल्याचे गजभारे यांनी आवर्जून सांगितले.

आपल्यातील नेतेमंडळी बहुजनाला एकत्र करण्याची भाषा करतात, आवश्यक केले पाहिजे,याबद्दल दुमत नाही.त्यासाठी पहिल्यांदा सर्व नेते एकत्र आले,तर आंबेडकरी समाज एकत्र येईल,त्यातून नवी बीज पेरणी होऊ शकते,मात्र तसे होताना दिसत नाही,परिणामी मागच्या लोकसभा निवडणुकीत मत विभाजनाचा फायदा भाजपाला झाला,यापुढे तरी असे होऊ नये,असे गजभारे यांनी अपेक्षा व्यक्त केली.

आगामी काळात पक्ष विस्तार करण्यासाठी मराठवाडाभर दौरे केले जाणार आहे. यातून कवाडे सर यांचे हात बळकट करणे हेच ध्येय असून कवाडे सर यांनी दिलेली संधीचे चीज केले जाईल,असे ग्वाही गजभारे यांनी दिली.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago