पुणे, बातमी24ः- काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वृद्धपकळाने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यू समयी ते 91 वर्षांचे होते.
काही दिवसांपूर्वी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनावर मात केली होती. परंतु किडनीच्या आजारातून ते बाहेर येऊ शकले नाही. बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. स्वातंत्रसैनानी ते काँग्रेसचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती. 1985 ते 86 काळात ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले. पक्षाच्या विविध पदावर व राज्याच्या मंत्रीमंडळात अनेक वर्षे त्यांनी मंत्री म्हणून विविध खात्याची जबाबदारी पार पाडली.
मराठवाडयाच्या राजकारणातील शिवाजी पाटील निलंगेकर यांचे नाव आग्रस्थानी होते. वृद्धपकाळात ही ते पक्षाच्या बैठकांना सक्रियपणे उपस्थितीत राहत असत. त्यांच्या पार्थिवार आजच निलंगा या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना-नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजपचे नेते तथा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू होत.
——-
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…