महाराष्ट्र

नांदेड जि.प. सीईओ होण्यासाठी शिवानंद टाकसाळे यांची प्रतिष्ठापणाला

नांदेड, बातमी24ः नुकतेच आयएएस मानांकन मिळालेल्या सनदी अधिकारी शिवानंद टाकसाळे हे नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी स्वतःची पद, प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जिल्ह्यातील आमदारांचे पाठबळ ते मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यासंबंधी सर्वस्वी निर्णय हा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा असणार असून, ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची सारथीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्यापासून मागच्य सहा महिन्यांपासून नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त आहे. अद्यापपर्यंत पालकमंत्र्यांना मर्जीतील अधिकारी मिळू शकलेला नाही.त्या दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी आले, महापालिकेला आयुक्त मिळाले. मात्र जिल्हापरिषदेला सीईओ मिळत नसल्याबद्दल आश्चर्य सुद्धा व्यक्त केले जात आहे.

सीईओ म्हणून येण्यासाठी सनदी अधिकारी पद मिळालेल्या विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त असलेल्या वर्षा ठाकूर, शिवानंद टाकसाळे यांचे नावे आघाडीवर आहेत. दोघांपैकी एक जण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ही शक्यता मागच्या तीन ते चार महिन्यांपासून शक्यता याच शब्दावर अडकून पडली आहे.

वर्षा ठाकुर यांच्यापेक्षा शिवानंद टाकसाळे हे नांदेड सीईओ म्हणून येण्यास बाजी लावून बसले नाही. नांदेड जिल्ह्यातील असा माणूस जो, की त्यांच्या परिचयाचा नसावा, ज्याला ते माझ्याबाबत प्रयत्न करा, अशी गळ ते घालत नसावे, जिल्ह्यातील आमदारांकडे बोलून बसले आहेत. काही अधिकार्‍यांना मध्यस्थीसाठी प्रयत्न करा म्हणून मागे लागलेले आहेत.हे प्रयत्न त्यांचे सहा महिन्यांपासून सुरु आहेत.

या सहा महिन्यांच्या काळात शिवानंद टाकसाळे हे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मर्जीत उतरले नसल्याचे तितकेच खरे आहे. तसे असते, तर टाकसाळे यांचे जि.प. सीईओ म्हणून तेव्हाच आदेश निघाले असते. अशोक चव्हाण हे टाकसाळे यांच्या व्यतरिक्त इतर अधिकार्‍यांचा सुद्धा शोधा-शोध घेत असावे. कदाचित त्यामुळे टाकसाळे यांना हिरवाकंदिल मिळत नसावा, या शक्यता नाकारता येत नाही. मात्र एक नक्की टाकसाळे यांना उठता-बसता, दिवस-रात्र नांदेड जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचेच स्वप्न पडत आहेत. यात मात्र शंका नाही.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago