महाराष्ट्र

अर्थसंकल्पात जिल्ह्यासाठी दीड हजार कोटींची तरतूद:- पालकमंत्री चव्हाण

नांदेड, बातमी24 : राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या सन 2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील 206 कामांसाटी सुमारे 1408 कोटी 93 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील विविध कामांना भरीव निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केले होते. पालकमंत्री म्हणून केलेल्या मागण्यांना अर्थमंत्री श्री. पवार यांनी भरीव तरतूद केल्याचे अर्थसंकल्पात दिसून आले आहे.
यानुसार, नांदेड जिल्ह्यात नाबार्ड अंतर्गत 46 कांमासाठी 134 कोटी 55 लाख, राज्यमार्गाच्या 32 कामांसाठी 356 कोटी 25 लाख, प्रमुख जिल्हा मार्गाच्या 86 कामांना 488 कोटी 63 लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयीन इमारतींच्या 9 कामांसाठी 216 कोटी 38 लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी निवासस्थानांच्या 14 कामांसाठी 41 कोटी 64 लाख, विश्रामगृहांच्या 11 कामांसाठी 47 कोटी 92 लाख, महसूल विभाग इमारती/निवासस्थानाच्या 2 कामांसाठी 11 कोटी 84 लाख, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इमारतीच्या 2 कामांसाठी 35 कोटी 86 लाख आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या इमारतीच्या 4 कामांसाठी 75 कोटी 86 लाख निधी अर्थसंकल्पित झाला आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील या विविध कामांना निधीची तरतूद केल्यामुळे पुढील वर्षभरात या कामांना वेग येईल व ती लवकर पूर्ण करण्यात येतील, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago