महाराष्ट्र

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुतीशास्त्र विभागाचा गौरव

 

नांदेड,बातमी24 :- भारतातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, गरोदर स्त्रियांना प्रसुतीदरम्यान व प्रसुतीपश्चात रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे आणि शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णास सन्मानजनक रुग्णसेवा देणे व त्यांचे संपूर्ण समाधान करणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून ‘लक्ष कार्यक्रम’ भारत सरकारच्यावतीने सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने प्रभावी अंमलबजावणी करुन राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन करीत नांदेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी आनंद व्यक्त करुन शासनाच्या आरोग्य विभागाने वेळोवेळी येथील विकास कामांना मदत करुन सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे रुग्णांची सेवा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करुन देता येत असल्याचे सांगितले.

भारत सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने 11 डिसेंबर, 2017 पासून ‘लक्ष कार्यक्रम’ सुरु केला आहे. या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी आपल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रिरोग व प्रसुतीशास्त्र विभागाने महिलांच्या मनात बालमृत्यू रोखण्यासाठी योग्य उपचारासह विश्वास निर्माण केला.

याच्या अंमलबजावणीसाठी जे गुणांकन ठेवण्यात आले होते त्यात 96 टक्के गुण मिळवून वैद्यकीय सेवेतील गुणवत्ता सिध्द करुन दाखविली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किंवा जिल्हा रुग्णालयात प्रसुतीचे प्रमाण 38.7 टक्क्यावरुन 78.9 टक्के एवढे वाढले आहे. लक्ष कार्यक्रमाअंतर्गत सर्व शासकीय महाविद्यालयामधील व इतर संस्थेमधील प्रसुतीगृहातील व इमरजन्सी ऑपरेशन थिएटरमधील सुविधा सुसज्ज व अद्ययावत करणे, हाय डिपेन्डन्सी युनिट, गंभीर रुग्णांसाठी ऑबस्टेस्ट्रीक आयसीयू तसेच नवजात बालकांसाठीच्या सुविधा अद्ययावत करणे याकडे लक्ष देण्यात आले.
उपलब्ध असलेल्या डॉक्टरांचे व निर्सिंगचे योग्य ते प्रशिक्षण करुन हा कार्यक्रम यशस्वी राबविणे आव्हानात्मक होते. अशा स्थितीत आपल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हे यश संपादन केले.

येथील स्त्रीरोग व प्रसुतीगृहातील सोयीसुविधांची तपासणी गुणांकन करणाऱ्या पथकाने 96 टक्के एवढे गुण देवून आपल्या येथील प्रसुतीसंबंधित रुग्णसेसेवा ही अत्यंत अद्ययावत व दर्जेदार असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago