महाराष्ट्र

रेमडिसेव्हीर इंजेक्शन 2 हजार 360 रुपयांना

नांदेड,बातमी24:- खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बाधितांना हे औषध मिळत नसल्याच्या व मिळाले तरी महाग दराने मिळत असल्याच्या असंख्य तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने यासाठी निश्चित दर केले, असून हे इंजेक्शन 2 हजार 360 रुपयांना मिळणार आहे.

यानुसार आता खाजगी दवाखाण्यामध्ये उपचार घेत असलेल्या कोणत्याही कोविड-19 बाधितांना या इंजेक्शनची प्रतिक्षा करावी लागणार नाही. हे इंजेक्शन आता अल्पदरात म्हणजेच रुपये 2360 या किंमतीत असेल,  असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व जिल्हा शल्यचिकित्सकांना लेखी कळविले आहे.

या इंजेक्शनबाबत जिल्हा प्रशासनातर्फे दक्षता घेतली जात असून शासनाने निर्धारीत केलेल्या दरानुसारच ते गरजूंना दिले जाईल याबाबत खबरदारी घेतली जात आहे. निर्धारीत केलेल्या किंमतीत गरजू कोविड बाधितांना इंजेक्शन मिळावे यासाठी नियमावली ठरविण्यात आली आहे.

ज्या खाजगी दवाखाण्यात बाधित उपचार घेत आहेत त्याला या इंजेक्शनची आवश्यकता भासल्यास संबंधित खासगी हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी बाधिताची माहिती दिलेल्या नमुन्यात भरुन ते पत्र जिल्हा शल्यचिकित्सकाच्या मंजुरीसाठी पाठविले जाईल. जिल्हा शल्यचिकित्सक कोविड बाधिताची स्थिती लक्षात घेऊन निर्धारीत दरामध्ये इंजेक्शन घेता यावे यादृष्टिने बाधिताच्या नातलगाला तसेच पत्र देईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहित राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
——–
या ठिकाणी मिळणार इंजेक्शन

नांदेड जिल्ह्यात हे इंजेक्शन मे. श्रीनाथ मेडिकल ॲड जनरल स्टोअर्स, श्रीनगररोड, वर्कशॉप कॉर्नर नांदेड येथे आणि प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र विष्णुपूरी नांदेड येथे उपलब्ध असेल.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago