महाराष्ट्र

महसूल मंत्र्यांकडून नांदेडच्या कार्याचे कौतुक

जयपाल वाघमारे

नांदेड, बातमी24:- सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातले,असून हजारो लोक बाधित होत आहे, ऑक्सिजन,इंजेक्शन व बेड तुटवडा असताना नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे, हे कार्य नक्कीच प्रशंसनीय असून पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी टीमचे अभिनंदन करावे तितके कमी असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

राजीव सातव यांच्या अंत्यविधीसाठी ते कळमनुरी येथे जाण्यासाठी नांदेडला काँग्रेसचे सर्व मंत्री व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शासकीय विश्रामगृह येथे होते.यावेळी थोरात यांनी विविध विषयांवर संवाद साधला.यावेळी बोलताना ते म्हणाले,की नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या भरमसाठ होती. सोबतच मृत्यू दर वाढलेला असताना,अशा परिस्थितीत नांदेड जिल्ह्यात ऑक्सिजन तुटवडा जाणवला नाही.आता तर रुग्ण संख्या दोनशे ते तिनशेच्या आत आली आहे.तसेच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ही आकडेवारी पाहता नांदेडचे कोरोना नियंत्रणाचे प्रयत्न कौतुक करावे असे असल्याचे त्यांनी सांगितले.

याचसोबत थोरात यांनी कोरोनाच्या संसर्गामुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला,असून केंद्र सरकार जीएसटीचा परतावा देत नाही,त्यामुळे राज्याला पगारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या संदर्भाने भाजप शासित राज्यांपेक्षा महाराष्ट्र परिस्थिती चांगली आहे, गुजरातमधील मृत्यू आकडे आणि उत्तर प्रदेशमधील लोकांचे मृत्यू गंगेच्या रूपाने पुढे आलेत. जगात विश्व गुरू म्हणून घ्यायचे आणि देशातील कोरोनाचे हाल यावर बोलायचे नाही,त्यामुळे मोदी यांची जागतिक पातळीवर प्रतिमा मलिन झाल्याची टीका थोरात यांनी केली.मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीस यांनी वैचारिक सभयता राखली पाहीजे,असा सल्ला यावेळी थोरात यांनी दिला.
——–
दोन भावंडातील भांडण

महसूल आयुक्त कार्यालयबाबत लातूर व नांदेड हा वाद दोन भावंडातील वाद आहे, त्यामुळे या वादात पाहुण्यांनी पडण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत या वादाच्या विषयाला थोरात यांनी बगल देण्याचा प्रयत्न केला.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago