Upनांदेड,बातमी24; कोरोनाच्या संख्येनं पुन्हा नवा उचांक मांडला असून दिवसभरात 7 जणांच्या मत्युची नोंद झाली तर 170 नवे कोरोनाच्या रुग्ण सापडले आहेत.
रविवार दि.2 रोजी 576 स्वब तपासण्यात आले. 407 अहवाल निगेटिव्ह तर 170 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2 हजार 156 एवढी झाली आहे. यात आरटी-पिसीआर चाचणीत 147 तर अंटीजन 23 रुग्ण वाढले आहेत.
दिवसभराच्या काळात 19 रुग्ण बरे झाले. सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णाची संख्या 954 झाली. तर सर्वाधिक रुग्ण संख्या 45 नांदेड महापालिका हद्दीत,त्यानंतर मुखेड-35 व नायगावमध्ये 33 रुग्ण आढळले.सध्या 1 हजार 103 रुग्ण उपचार घेत असून त्यातील 17 रुग्ण गंभीर आहेत,यात 7 महिला तर 10 पुरुषांचा समावेश आहे.
——–
सात जणांचा मृत्यू
गोकुळ नगर येथील 59 वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात दि. 31 जुलै रोजी, वजीराबाद येथील 62 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात दि.1 जुलै, लोहा तालुक्यातील जानापुरी येथील पुरुषाचा दि.1 रोजी शासकीय रुग्णालय,कंधार तालुक्यातील तळ्याची वाडी येथील 67 महिलेचा दि.2 रोजी शासकीय रुग्णालय, नांदेड शहरातील नारायण नगर येथील 50 वर्षीय पुरुषाचा दि. 2 रोजी, कंधार येथील म्हालिंगी येथील 51 वर्षीय पुरुषाचा दि. 2 रोजी शासकीय रुग्णालय, तसेच वसंत नगर येथील 72 वर्षीय पुरुषाचा दि.2 रोजी शासकीय रुग्णालय येथे मृत्यू झाला,त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 90 एवढी झाली
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…