महाराष्ट्र

राज्यातील अत्याधुनिक मीडिया स्टुडिओ

नांदेड, बातमी24ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मीडिया स्टुडिओचे काम अंतिम टप्प्यात आले असून अत्यंत अत्याधुनीक यंत्रणा असलेला हा स्टुडिओ लवकरच विद्यार्थी व व्यावसायिक कामासाठी खुला होणार आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात माध्यम शास्त्र संकुलाचे उद्धघाटन 2009-10 या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. माध्यम शास्त्र संकुलाचे संचालक डॉ दीपक शिंदे यांनी नियोजन केले, निधी उपलब्ध करून घेण्यासाठी वेगवेगळ्या संस्था कडे प्रस्ताव पाठवले व सुमारे दोन करोड रुपये या कामाकरिता उपलब्ध झाले. त्यातुन या स्टुडिओची उभारणी झाली.

विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाचे शिक्षण मिळावे, या करिता विद्यापीठ अनुदान आयोगाकडे 12 व्या वित्त आयोगाच्या तरतूदीनुसार प्रस्ताव देऊन यंत्र सामुग्री मंजूर करून घेतली. त्यातुन अँपल या कंपनीचे आय मॅक संगणक व व्हिडीओ ग्राफी करिता सोनी, निकॉन कंपनीचे व्हिडीओ व स्टील कॅमेरे खरेदी करण्यात आले आहेत. सोबतच मीडिया उद्योगात वापरले जाणारे एडिटिंग सॉफ्ट वेअर व अनुषंगीक साहित्य खरेदी करण्यात आले आहे.

स्टुडिओ चे काम मार्गी लावण्यासाठी बेंगलोर, हैदराबाद, मुंबई येथून कारागीर बोलावत विविध कंपन्याना काम देत हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या स्टुडिओमुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. काही व्यावसायिक कामे करून निधी उपलब्ध करता येणार आहे.अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अंतिम टप्प्यात आलेल्या या कामावर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरु आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago