महाराष्ट्र

प्रियकराकडून प्रियशीचा घात; ऍसिड हल्ला करून पेटविले;खळबळजनक घटना

बीड-नांदेड,बातमी24:- दीड वर्षा पासून एकमेकांच्या प्रेमात अडकलेल्या देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील जोडपे पुण्यात राहत होते,पाण्यावरून गावाकडे येत असताना त्या प्रियकर तरुणाने तिच्यावर ऍसिड हल्ला करून पेटवून दिले.या घटनेत त्या तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दि.15 रोजी पहाटे घडली,तर दुपारच्या सुमारास उघडकीस आली

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील मयत तरुणी सावित्रा(वय.22) असे नाव आहे,त्याच गावातील आरोपी अविनाश राजूर हे पुण्यावरून नांदेडच्या दिशेने निघालो. बीड जिल्ह्यातील येलंब घाट मांजरसुबा-केज मार्गावर आले असता, रात्री तीन वाजेच्या सुमारास गाडी थांबवून त्या तरुणीवर ऍसिड हल्ला केला.त्यानंतर तिला पेट्रोल टाकून पेटवून देऊन तो फरार झाला.

कुणीतरी जिवाचा आकात करून ओरडत असल्याचा आवाज येणाऱ्या जाणाऱ्यांना ऐकू येत होता, परिसरातील लोकांनी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी किकाळत असल्याचे दिसून आले.

यावरून नेकनूर पोलिसांना माहिती असता,गंभीर भाजलेल्या तरुणीस बीड येथील रुग्णालय येथे नेण्यात आले,मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबावरून त्या प्रियकर तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.या घटनेचा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी निषेध नोंदविता आरोपीला तात्काळ अटक करून शासन करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.


आरोपीस 24 तासात अटक

आरोपी अविनाश राजूरे यास पोलिसांनी देगलूर येथून अटक केली आहे.या घटनेत आरोपीस।पोलिसांनी 24 तासात अटक करून दाखविले

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago