शासनाच वाणच ठरल वांझोट
नांदेड, बातमी24ः- विविध सोयाबीन कंपन्यांनी शेतकर्यांची फ सवणूक केलेल्या प्रकारामुळे शेतकर्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा बोगस बियाणे विक्री करणार्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली, असली तर यात कृषी विभागाचे महाबीज सोयाबीनच बियाणे सुद्धा वांझोटे निघले. याप्रकरणी शासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. खासगी कंपन्यांवर कारवाई होत असताना महाबीजकडे प्रशासनाकडून डोळेझाक करून आहे.
मृगनक्षत्रामध्ये पावसाने सुरुवात केल्याने शेतकर्यांनी वेळेत पेरणी केली. मात्र नगद पिक म्हणून शेतकर्यांनी सोयाबीनकडे कल दिला. परंतु; अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवणच झाली नाही. यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी अनेक ठिकाणी शेतकर्यांना दुबारपेरणी करावी लागली आहे. एकीकडे या प्रकरणी शेतकर्यांमधून आक्रोष सुरु झाल्यानंतर सरकार जागे झाले. बोगस बियाणे विकणार्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी रेटली जाऊ लागली.
शेतकरी व सरकारच्या दबावात जिल्हा प्रशासनाने बोगस बियाणे विक्री केलेल्या ईगल, सारस व यशोदा या बियाणे कंपनीवर फ ौजदारी कारवाई करण्यात आली. परंतु या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. तर इतर कंपन्यांप्रमाणे महाबीज महामंडळाकडून महाबीज नावाने सोयाबीनचे बियाणे विक्री करण्यात आले. यासंबंधी 350 तक्रारी असताना जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक व कृषी विकास अधिकारी मुगगिळून गप्प आहेत.
ईगल, सारस व यशोदाप्रमाणे महाबीज महामंडळावर सुद्धा गुन्हे नोंद करण्याची मागणी होत असताना जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच शेतकर्यांची फ सवूक करणार्या इतर कंपन्यांवर ही कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…