महाराष्ट्र

एमआयएम सोबत भविष्यातही युती करण्याचा प्रश्नच येत नाही:-प्रकाश आंबेडकर

नांदेड,बातमी24:- लोकसभा निवडणुकीत एमआयएमला घेऊन आम्ही लढलो,परंतु विधानसभा निवडणुकीत अवास्तव जागेची मागणी केली गेली.त्यामुळे युती तोडणे भाग पडले,असे सांगत वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुढील काळात एमआयएमसोबत युती होणे कदापीही शक्य नसल्याचे जाहीर केले,ते नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद घेण्यात आली,यावेळी ते म्हणाले,की विधानसभा निवडणुकीत 40 जागा देऊ असे सांगितले होते.परंतु एमआयएमकडून शंभर जागेची मागणी केली जाऊ लागली,तसे केले असते,तर भाजपला अधिक लाभ मिळाला असता,असे ऍड.आंबेडकर यांनी सांगितले. पुढील काळात होणाऱ्या कोणत्याच निवडणुकीत एम आय एमसोबत युती होणार नसल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत.

पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीने कारखानदार उमेदवार दिला. पदवीधरसंबंधी या पक्षाची भूमिकाच नाही,केवळ पैसा या जोरावर ते निवडून येत आले आहेत.पदवीधरच्या प्रश्नावर खुली चर्चा करण्यासाठी भाजपसह राष्ट्रवादीच्या उमेदवाराने पुढे यावे, असे आव्हान माझे असेल,यासाठी खुद्द शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा,असे ही ऍड. आंबेडकर यांनी म्हणाले.

या निवडणुकीत वंचीतच्या उमेदवारास विजयी करा,सगळे पदवीधरांचे प्रश्न निकाली काढू, यासाठी सर्व घटकांनी साथ द्यावी,असे आवाहन ऍड.आंबेडकर यांनी केले.यावेळी वंचीतचे उमेदवार पांचाळ, राज्य प्रवक्ते फारूक अहेमद, शिवा नरगले,प्रशांत इंगोले, संघरत्न कुरहे आदींची उपस्थिती होती.
——–
वंचीतची ताकद वाढल्यामुळे फोडाफोडी
वंचीत बहुजन आघाडीची ताकद वाढल्यामुळे इतर पक्षांकडून वंचीतचे नेते फोडले जात आहेत. मी जाणाऱ्यांचा विचार करत नाही.जे सोबत आहेत, त्यांना घेऊन काम करतो,असा टोला प्रा.यशपाल भिंगे यांचे नाव न घेता ऍड.भिंगे यांनी लगावला.
——

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago