नांदेड, बातमी24: काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो यात्रा नाेव्हेंबरमध्ये नांदेड जिल्ह्यात आगमन करणार आहे. यात्रेच्या स्वागताची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. याच अनुषंगाने नांदेड जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज (दि. 28) काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुवा तसेच भारत जोडो यात्रेतील खा. राहुल गांधी यांचे प्रमुख सहकारी के. बी. बैजू, सुशांत मिश्रा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राज्य व देशभरातून येणाऱ्या अतिथींना सहकार्य व मार्गदर्शन करण्याच्या हेतूने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हे कार्यालय उभारण्याचे निर्देश दिले होते. आयटीएम कॉलेजचे सभागृहात उभारण्यात आलेल्या या कार्यालयाचे प्रमुख समन्वयक म्हणून माजी मंत्री डी. पी. सावंत जबाबदारी सांभाळतील. भारत जोडो यात्रेच्या नांदेड जिल्हा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर, नांदेड जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष माजी आ. वसंतराव चव्हाण, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, महापौर सौ. जयश्रीताई पावडे, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, जिल्हा काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डाॅ. सौ. मीनलताई खतगावकर, प्रदेश सरचिटणीस अभिजित सपकाळ, शाम दरक, नारायण श्रीमनवार आदी मान्यवर उपस्थित होते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…