मुंबई, बातमी24ः नागपुर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदलीचे आदेश अखेर बुधवार दि. 26 ऑगस्ट रोजी निघाले. ते बदलीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सचिव म्हणून मुंबई येथे जाणार आहेत.
नागपुर महापालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी धडाकेबाज निर्णय घेत सत्ताधार्यांसह प्रशासनावर वचक निर्माण केला होता. त्याचशिवाय शहराअंतर्गत शिस्त लावण्याचे काम केले होते. त्यामुळे सत्ताधारी भाजप पदाधिकारी व नगरसेवकांविरुद्ध मोठे वाद निर्माण झाले होते. मुंडे यांची बदली करण्यात यावी, यासाठी भाजपकडून मोठा दबाव निर्माण केला होता. तर काँग्रेसकडून तुकाराम मुंडे यांचे समर्थन केले जाऊ लागले होते.
दरम्यानच्या काळात तुकाराम मुंडे यांची पाठराखण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केली होती. परंतु बुधवारी तुकाराम मुंडे यांच्यासह इतर काही सनदी अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाले आहेत. ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सचिव म्हणून बदलीने जाणार आहेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…