महाराष्ट्र

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा

नांदेड, बातमी24ःभाऊराव चव्हाण साखर कारखान्याने गेल्या वर्षीची थकीत एफआरपीचे प्रतिटन 500 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री तथा कारखान्याचे मुख्य प्रवर्तक नामदार अशोक चव्हाण यांच्या घरासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा इशारा भोकर मतदार संघातील सरपंचांनी भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे चेअरमन गणपत भाऊ तिडके व्हाईस चेअरमन प्रा कैलास दाड यांना निवेदनाद्वारे दिला.

भाऊराव चव्हाण कारखान्यांनी पाचशे रुपये देण्याची पूर्तता केली नाही. 14 ऑगस्टपर्यंत भाऊराव कारखान्यांनी गेल्यावर्षीची थकीत बाकी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा न केल्यास 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य देणे ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करू असा इशारा दरवाढ नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले, उपसभापती अशोक कपाटे,सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा देगाव चे सरपंच भगवान कदम, कोंढा सरपंच राम कदम ,बारड चे उपसरपंच बाळासाहेब देशमुख,सरपंच सतीश कदम, सरपंच विजय जाधव, सरपंच संजय सावते,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष कपाटे कैलास कल्याणकर गणपत शिंदे,संदीप व्यवहारे,गोविंद कपाटे, नारायणराव कपाटे ,शिवाजी कपाटे आदींनी दिला.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago