नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील प्रभारी कार्यकारी अभियंता पदावर काही महिन्यांपूर्वी विराजमान झालेले रविंद्र बारगळ यांच्या विरोधात मोठया तक्रारी वाढल्या आहेत. जिल्ह्यातील आमदारांपासून ते जिल्हा परिषद सदस्यांपर्यंत सगळेच नाराज आहेत. आमदार शामसुुंदर शिंदे यांच्या पत्रावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बारगळ यांना कार्यमुक्त करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. या पत्राची जिल्हा परिषद प्रशासन दखल घेणार की, नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखविणार याकडे लक्ष लागले आहे.
आमदार शामसुंदर शिंदे यांनी बारगळ यांच्या काळातील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी मंत्रालयस्तरावरून सुरु केली आहे. या संदर्भाने शामसुुंदर शिंदे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाब पाटील यांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली. या प्रकरणी चौकशी करण्यात करून योग्य ती कारवाई मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी करावी, असे शिंदे यांच्या पत्रावर नमूद केले आहे.
जिल्हा परिषद प्रशासन हे पाणी पुरवठा मंत्र्यांच्या पत्राची दखल घेणार, की केराची टोपली दाखविणार याकडे लक्ष लागले आहे. आतापर्यंत रविंद्र बारगळ यांना जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. या मोबदल्यात मंगाराणी अंबुलगेकर यांची बिले उचलून दिल्याची चर्चा आहे. तसेच बडया अधिकार्यांना देऊन-घेऊन असतात.त्यामुळे कारवाई होत नसल्याची चर्चा अधिकारी-कर्मचारी व सदस्यांमध्ये नेहमी असते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…