राजकारण

आझाद समाज पक्षांची महाराष्ट्राची धुरा राहूल प्रधान यांच्या खांदावर

नांदेड, बातमी24ः नांदेड येथील आंबेडकर समाजातील युवक नेतृत्व राहूल प्रधान यांच्या खांदावर आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी महाराष्ट्राची धुरा सोपविली आहे. महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर आलेल्या चंद्रशेखर आझाद यांच्या उपस्थितीत राहूल प्रधान यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची सुत्रे स्विकारली.

राहूल प्रधान यांनी काही दिवसांपूर्वी युवा पॅथर या सामाजिक संघटना बरखास्त करून आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. यापूर्वी यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीत काम केले होते.त्यानंतर त्यांनी युवा पॅथर नावाची संघटना संपुष्टात आणत दिल्ली येथे आझाद समाज पक्षात प्रवेश केला होता.

चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर भारतामध्ये दलित समाजातील युवकांचे आझाद पक्षाच्या माध्यमातून संघटन उभारले आहे. देशभर होणार्‍या दलितावरील अन्यायाविरोधात आवाज उठविणारे प्रतिक म्हणून ते पुढे आले आहेत. हाथरस सारख्या घटनेत चंद्रशेखर आझाद यांची पिडितांच्या बाजून घेतलेली भूमिका देशभर लक्षवेधी व निर्णायक ठरली होती.
——-
अस्वस्थ समाजाचे प्रतिक म्हणून आझाद समाज पक्ष देशभर काम करत आहे. महाराष्ट्रात सुद्धा युवकांचे संघटना बांधणे हे पुढील काळात महत्वाचे कार्य असणार आहे.

राहूल प्रधानः नवनियुक्त राज्य अध्यक्ष आझाद समाज पक्ष, महाराष्ट्र

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago