नांदेड, बातमी24ः- भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.असे निकटवृतीयांकडून सांगण्यात आले.
आतापर्यंत पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्यावर उपचार सुरु आहेत. या राजकीय नेत्यांना कोरेानाचा संसर्ग झालेला असताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव माजी सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील यांचा सुद्धा अहवाल रात्री कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी पावडेवाडी नाका येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती त्यांच्या निकटवृतीयांकडून देण्यात आली.
——–
चौकट
प्रवीण पाटील चिखलीकर हे मुंबईवरून रविवारी सकाळी आले होते. काळजी म्हणून त्यांनी अॅटीजन टेस्ट केली असता त्यात ते कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियातील सर्वांची चाचणी करण्यात आली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…