राजकारण

जिल्ह्यातून दहा हजार पत्रे शरद पवारांना जाणारः किशोर देशमुख

जिल्ह्यातून दहा हजार पत्रे शरद पवारांना जाणारः किशोर देशमुख

नांदेड, बातमी24ः श्री राम जन्म मंदिर बांधण्यास विरोध केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चा ग्रामीणच्या वतीने दहा हजार पत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना पाठविले जाणार असून हे काम अंतिम टप्यात आले असल्याची माहिती भाजप युवा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किशोर देशमुख यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपुजन झाले. यावरून शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष केले होते. कोरोनाच्या संकटात मंदिर उभारणी करणे गौण विषय असल्याचा मुदा लावून धरला होता. या विषयाचे भाजपने चांगले भांडवल केल्याचे बघायला मिळून जिल्ह्या-जिल्ह्यातून जय श्रीराम अशी घोषणा असणारे पत्र शरद पवार यांच्या सिलव्हर ओक या निवास्थानी पाठविणे सुरु केले आहेत.

या विषयी बोलताना अ‍ॅड. किशोर देशमुख म्हणाले, मंदिराची उभारणी केंद्र सरकारकडून होत नसून एका शिलान्यास समितीकडून होत आहे. आपणास श्रीराम मंदिराचा तिटकारा आहे, तर इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंढरपुरला विठ्ठलच्या दर्शनाला गेलेच ना, मग श्रीराम मंदिराला विरोध करणे गैर असल्याचे अ‍ॅड. देशमुख यांनी सांगितले. या संदर्भात प्रत्येक तालुक्यात बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार दहा हजार पत्रे सिलव्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याचे अ‍ॅड. देशमुख म्हणाले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago