नांदेड, बातमी24ः- देगलूर येथील एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाने कोविड केअर सेंटर येथील भौतिक सुविधांच्या बाबतीत पोलखोल करणारा व्हिडिओ समोर आणून प्रशासनाच पितळ उघडे पाडले होते. या प्रकरणात दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना खासदा प्रताप पाटील चिखलीकर यांनी देत चौकशी करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची दखल घेत खुद जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी करत अधिकार्यांना चांगलीच तंबी दिल्याचे समजतेे.
चार दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या पंचविसीतील तरुणाने देगलूर येथील आयटीआय कोविड केअर सेंटर येथील रुग्णांची हेळसांड कशाप्रकारे होत आहे. हे दर्शविणारा व्हिडिओ समोर आणला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून या तरूणाने प्रशासनाकडून कशाप्रकारे रुग्णांंच्या बाबतीत निष्काळजीपणा केला जात आहे. हे दर्शविणारा व्हिडिओ व्हायरल केला होता. यावरून प्रशासनावर टीकेचे बाण सुटत आहेत.
सदरचा व्हिडिओ पाहून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्याशी संपर्क करून चौकशी केली. या प्रकरणात दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सुद्धा दखल घेत गुरुवारी दि. 16 रोजी देगलूर गाठले. या वेळी कोविड केअर सेंटरची पाहणी करत अधिकार्यांना चांगले फै लावर घेतल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…