राजकारण

नांदेड दक्षीणमधून लढलेले उमेदवार आतापासून उत्तरमधून तयारीला

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः

विधानसभेची निवडणूक नांदेड उत्तरमधून लढणार्‍या वंचित बहुजन आघाडीचे त्या वेळचे उमेदवार राहिलेल्या फ ारुक अहेमद यांनी आता दक्षीणेकडून उत्तरेकडे कुच केल्याचे बोलले जात असून पुढील निवडणूक ते नांदेड उत्तरमधून लढण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत राज्यभर राजकीय हवा करणार्‍या वंचित बहुजन आघाडीला विजय मात्र मिळाला नव्हता. परंतु निर्णायक मतदान वंचितच्या उमेदवारांनी घेतले होते. त्याच बळावर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात कुणाशीही युती न करता उरतलेल्या वंचितला खाते उघडू शकली नव्हती. घेतलेल्या मतांची टक्केवारी बर्‍यापैकी होती.

नांदेड जिल्ह्यातूनही विधानसभा निवडणुकीत वंचितची उमेदवारी मिळावी, यासाठी बर्‍याच इच्छूकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते.त्यात काहींना उमेदवारी मिळाली होती. त्याचप्रमाणे नांदेड दक्षीणमधून विधानसभा निवडणूक लढविलेले परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्तेे तथा वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ते फ ारुक अहेमद यांनी चांगली लढत दिली होती.

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फ ारुक अहेमद यांनी 26 हजार 713 मते घेतली होती. त्या वेळी त्यांना मुस्लीम व इतर समाजाच्या मतांची मदत झाली असती तर विजयाचे दावेदार ते ठरू शकले असते. नांदेड दक्षीणपेक्षा नांदेड उत्तरमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे. नांदेड उत्तरमधून वंचितचे उमेदवार राहिलेल्या दिवंगत मुकुंद चावरे यांनी 25 हजार 500 तर एमआयएमच्या उमेदवार मोहमद फेरोज यांनी तब्बल 41 हजार मते मिळविली होती.

नांदेड उत्तरमध्ये दलित व मुस्लीम असे समीकरण जुळल्यास विजयाची संधी मिळू शकते, हा अंदाज बांधून फ ारुक अहेमद हे उत्तरमधून कामाला लागले आहेत. यासाठी तरोडा परिसरात कार्यालय सुद्धा उभारले, असून उत्तरमधून मुस्लीमांसह अन्य समाजातील लोकांना वंचितशी जोडण्याचा प्रयत्न चालविला आहे.

फ ारुक अहेमद यांची सक्रिया इतर पक्ष पदाधिकार्‍यांच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्याच्यापाठोपाठ लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून दुसर्‍या क्रमांकाची मते घेतलेल्या शिवा नरंगले यांनी सुद्धा मतदारसंघात सर्वाधिक सक्रियता आहे.नरंगले हे जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात.वंचितमध्ये मायक्रो काम हे फ ारुक अहेमद यांचेच असून आतापासून सुुर केलेली तयारी ही पक्ष वाढीसाठी सुद्धा पोषक ठरणारी मानली जाते.ही मोर्चे बांधणी शेवटपर्यंत यशस्वी ठरल्यास ते या मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची क्षमता ठेवू शकतात

 

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago