राजकारण

चव्हाणांचे पत्र धनंजय मुंडे यांना तर चिखलीकरांचे अजित पवारांना पत्र

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः राज्यात बदल्यांचा हंगामाने जोर धरलेला असताना जिल्हा परिषदेतील एका अधिकार्‍याची बदली करण्यात यावी, यासंबंधीचे पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तर भाजपचे नांदेड नांदेड खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्या अधिकार्‍याची बदली करू नये, यासंबंधीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. कोणाच्या पत्राचा जोर भारी पडणार हे काही दिवसात कळणार आहे.

कोरोनाच्या काळात सामाजिक सेवेच्या माध्यमातून अन्नछत्रालय, कोरोना किट व भाजीपाला वाटपात स्तुत्य काम करून सामाजिक व राजकीय पातळीवर गवगवा मिळविणारे ते अधिकारी आहेत. मधल्या काळात त्यांना मानसिक रुग्ण म्हणून संबोधण्यात आले. त्यांच्या विभागाच्या सभापतीसोबत विळया-भोपळयाचे सुरु आहे. दरम्यानच्या काळात असभ्य भाषेचा वापर व बंदुकधारी अंगरक्षक सोबत बाळगल्याची तक्रार त्या खात्याच्या सभापतींनी केली होती. या तक्रारीचा संदर्भ जोडत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकार्‍याची नांदेड येथून बदली करण्यात यावी, यासंबंधीचे पत्र मागच्या महिन्यात आले.

या पत्रानंतर मंत्रालयस्तरावर कमी-अधिक प्रमाणात हलचाली सुरु झाल्या आहेत. नवा अधिकारी शोध ही सुुर झाला आहे. असे असताना त्या अधिकार्‍याच्या बाजूने भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना पत्र दिले, असून या अधिकार्‍याची बदली करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांचे एका अधिकार्‍यासंदर्भात विरोध व समर्थन करणारे पत्र गेल्यामुळे राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांपैकी एकाच्या पत्राचा विचार होणार असला, तरी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या पत्रावर मंत्रालयस्तरावर हलचाली सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago