नांदेड, बातमी24ः- राज्यातील मुदत संपलेल्या मराठवाडा वैधानिक विकास महामंडळासह अन्य महामंडळाला मुदतवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंग कोशियारी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट असल्याचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगत या मागणी संबंधी शुक्रवारी पत्र पाठविल्याचे खासदार चिखलीकर यांनी कळविले.
राज्यातील विविध भागांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्यातील अनेक भागामध्ये वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाचा कार्यकाळ 30 एप्रिल 2020 रोजी पुर्णत्वास आला आहे. राज्यात मागासलेल्या मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष मराठवाडा विकास वैधानिक महामंडळाच्या वतीने भरुन काढल्या जातो. मराठवाडा विकास वैधानिक महामंडळाच्या वतीने मराठवाडयाचा कांही अनुशेष भरुन निघाला आहे तर सिंचन उद्योग,शेती,रस्ते या बाबतीतील प्रचंड भौतीक व आर्थीक अनुशेष अजूनही कायम आहे. यासाठी शासनाने मराठवाडा वैधानिक विकास महामंडळासह अन्य महामंडळाला मुदतवाढ द्यावी अशी मागणी नांदेडचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
—–
चौकट
वैधानिक विकास महामंडळाच्या मुदतवाढी संबधी ते लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेणार असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…