राजकारण

वंचित बहुजन आघाडीचा लॉकडाऊनला पाठिंबा

जिल्हाध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले यांची माहिती

नांदेड,बातमी24ः-जिल्हा स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भावावर अंकुश मिळविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने दुबार संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास वंचित बहुजन आघाडीकडून सहकार्याची भूमिका घत आहे. मात्र संचारबंदी काळात गोरगरीब, मजूर, कष्टकरी, कामगार वस्त्यांमध्ये दैनंदिन गरजांची विशेष यंत्रणेमार्फत पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने सजग रहावे, असे आवाहन नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी केले आहे.

इंजि. प्रशांत इंगोले यांनी या आवाहनात म्हटले आहे की, जिल्हा प्रशासनाला याआधीही वंचित बहुजन आघाडी तर्फे कोरोना लॉकडाऊन दुसर्‍या फेरीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बाबी लक्षात आणून दिल्या आहेत. त्यात प्रामुख्याने केरळ मॉडेलच्या धर्तीवर जनजागृतीची आग्रही मागणी केलेली आहे. कष्टकरी अर्थात हातावर पोट असणार्‍या गोरगरिबांच्या चुली लॉकडाऊन काळात बंद होणार नाहीत, याची खबरदारी घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे, असेही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनास कळविण्यात आले.

कोरोनामुळे नांदेड जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती बनत चालली आहे. तरी जनतेने घाबरून जाऊ नये. स्वतःची प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देऊन कोरोनाला अटकाव करावा. प्रशासनाने कोरोना साखळी खंडित करण्यासाठी उचललेल्या दुबार लॉकडाउनच्या निर्णयाचे स्वागत करून सहकार्य करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात आले आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago