राजकारण

एका प्रभारी कार्यकारी अभियंत्यामुळे जि.प. अध्यक्ष विरुद्ध सदस्य वाद विकोपाला

आजच्या जलव्यवस्थान समितीच्या बैठकीला पडसाद उमटणार

नांदेड, बातमी24ः-जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची बैठक शुक्रवार दि. 10 जुलै रोजी दुपारी एक वाजता होणार आहे. सदरची बैठक ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर.एस. बारगळ यांच्या अडमुठ भूमिकेमुळे वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. बारगळ यांच्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य वाद सुरु असून याचे पडसाद आज दुपारी होणार्‍या बैठकीत उमटण्याची चिन्हे आहेत.

पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. जोशी हे सेवानिवृत्त झाल्यानंतर या विभागास आठ ते नऊ महिन्यांच्या काळात पूर्ण वेळ कार्यकारी अभियंता येऊ शकले नाही.उप अभियंत्याकडे पदभार सोपवून कारभार चालविला जात आहे.या विभागाचे अतिरिक्त पदभार देगलूर उपविभागाचे उपअभियंता आर.एस. बारगळ यांच्याकडे आला. मात्र या दरम्यानच्या काळात अनियमिततेला उत आल्याच्या प्रकारी आमदार व जिल्हापरिषद सदस्यांकडून होत आहे.

लोकप्रतिनिधींशी संवाद व्यवस्थित न साधणे, सदस्यांशी आरेरावीची भाषा करणे, मोजक्या पदाधिकारी व प्रभारी सीईओंना हाताशी धरून बिल काढण्यास मदत करणे, असे प्रकार त्यांचे समोर येत आहे. तसे असले,तरी जिल्हा परिषद सदस्यांसोबत वरचढपणा करण्यामुळे बारगळ चर्चेत आले आहे.यासंबंधी काही सदस्यांनी जिल्हापरिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्याकडे तक्रार केली. परंतु काही झाले,तरी बारगळ यांना हटविणार नसल्याची भूमिका घेत सदस्यांना तोंडघसी पाडल्याची चर्चा दोन दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत बारगळ प्रकरणावरून अध्यक्ष-विरुद्ध समिती सदस्य असा वाद उफ ाळून येण्याची शक्यता आहे.
—–
बैठकीला बारगळ येण्याची कमी शक्यता
आज होणार्‍या बैठकीत प्रभारी कार्यकारी अभियंता बारगळ यांची अनेक प्रकरणांचा पाडा समिती सदस्यांकडून वाचला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारगळ यांना गैरहजर ठेवून बैठक घेणे किंवा बैठक रद्द करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बैठकीकडे सगळयांच्या नजरा लागल्या आहेत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago