राजकारण

अशोक चव्हाण यांचे नेतृत्व नाकारलेल्या माजी नगराध्यक्षाचा पुन्हा नेतृत्वावर विश्वास

 

नांदेड,बातमी24:-कुंडवाडीचे माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते डॉ.सायन्ना शेंगुलवार आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपाला जय श्री राम करत राज्याचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजचा झेंडा खांद्यावर घेतला होता.

माजी नगराध्यक्ष राहिलेले डॉ.सायन्ना शेंगुलवार हे एक जनाधार असलेला उच्च विद्याविभुषित राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यानच्या काळात कांही स्थानिक कारणामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतु ते या पक्षात ते फार काळ रमले नाहीत. त्यामुळे त्यांनी भाजपाला अखेरचा जय श्री राम केला व काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ.अमरनाथ राजुरकर यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. यावेळी बिलोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, मनपाचे सभागृह नेते सरदार विरेंदसिंघ गाडीवाले, नगरसेवक विजय येवनकर, मजुर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, कुंडलवाडी चे नगरसेवक शेख मुख्त्यार, माजी नगरसेवक राजु पोतनकर, शहराध्यक्ष प्रदिप अंबेकर, भीम पोतनकर आदिंची उपस्थिती होती.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago