नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचे केंद्र तसेच अनेक पदे भूषविलेले माजी राज्यमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांचे कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले,मृत्यूसमयी ते 82 वर्षांचे होते.
मयत गंगाधरराव कुंटुरकर यांचा नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर अनेक वर्षे प्रभाव राहिला.काँग्रेस,राष्ट्रवादी व काही। वर्षांपूर्वी ते भाजपवासी झाले होते. त्यांच्या राजकारणांची सुरुवात कुंटुरचे सरपंच पदापासून झाली,त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार,खासदार,जिल्हा बँकेचे संचालक,तसेच राज्य सहकारी बँकेचे संचालक अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा दबदबा राहिला.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ते उभे होते,मात्र प्रकृती आस्वास्थ असल्या कारणामुळे ते काल मतदानाला हजर राहू शकले नव्हते.
शनिवार दि.3 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांची औरगाबाद येथील एका खासगी रुग्णलायत प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने वृत्त कळताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली. अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…