राजकारण

आमदार जवळगावकर यांच्या संपर्कातील आठरा जणांचा स्वॅब प्राप्त

नांदेड, बातमी24ः हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर संपर्कात आलेल्या काही जणांचा अ‍ॅटीजन किटव्दार स्वॅब घेण्यात आले. हे स्वॅब सकाळी संबंधितांना प्राप्त झाले आहे. सर्वच्या सर्व जणांचे स्वॅब हे निगेटीव्ह आले. अ‍ॅटीजन किटव्दारे तपासणीमध्ये अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर आरटी-पीसीआर चाचणी तपासणी केली आहे. यासंबंधीचा अहवाल सायंकाळपर्यंत येणार आहे.

माधवराव पाटील जवळगावकर यांचा स्वॅब मंगळवारी रात्री कोरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांना बुधवारी मुंबई येथे हलविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आठरा जणांचे स्वॅब घेण्यात आले. संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वॅब हे निगेटीव्ह आले आहेत. यात काही पक्ष पदाधिकारी व अधिकारी-कर्मचार्‍यांचा समावेश आहे. आमदार जवळगावकर यांची प्रकृती ठणठणीत असून माझ्या तबियती बाबत कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, लवकर बरा होऊन परतणार असल्याचा व्हिडिओ जवळगावकर यांनी रुग्णालयातून सादर केला.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago