नांदेड,बातमी24:-देगलूर बिलोली मतदार संघातील आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अचानक जाण्याने मतदारसंघात पोकळी निर्माण झाली ही पोकळी भरून काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे राज्याचे प्रवक्ते फारूक अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या या महाभयंकर काळात मोठमोठ्या लोकप्रतिनिधींनी बचावात्मक भूमिका घेतली. मात्र सामान्य जनतेच्या हालअपेष्टांना थांबवण्यासाठी आपल्या जीवाची जराही पर्वा न करता वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष होता जो जनतेच्या न्याय व हक्कासाठी लॉकडाऊन विरोधात रस्त्यावर उतरला.
दिवसेंदिवस नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या मागासवर्गीया वरील हल्ला व काँग्रेस आणि भाजप एकमेकांच्या जगजाहीर मित्र असल्याचे चित्र सबंध जिल्ह्यात पहायला मिळाले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातील रोही पिंपळगाव येथे मागासवर्गी यावर घातलेला बहिष्कार व तसेच भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या लोहा मधील शिवनी जामगाव येथील एडके परिवारावर झालेला अत्याचार. हा ज्वलंत प्रसंग वंचित बहुजन आघाडी कधीच विसरणार नाही. आणि अशा अनेक समस्या व प्रसंगाचा विचार करता सर्वसमावेशक न्याय व हक्काच्या अंमलबजावणीसाठी हक्काचा आमदार हवा. आणि यासाठी सत्तेपासून वंचित असलेल्या समूहाने जर वंचित ला साथ दिली तर किनवटच्या पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती करू. असे प्रतिपादन फारूक अहमद यांनी केले.
मराठा आरक्षणावर वर बोलताना त्यांनी सत्ताधारी तथा विरोधी पक्ष या दोघांनाही मुळात आरक्षण द्यायचाच नाही. व तसेच न्यायालयाने मुस्लिम आरक्षण कायम ठेवावे असे सांगितले असताना सुद्धा या सत्ताधाऱ्यांनी तो मिळू दिला नाही. मग कायद्यात न बसणारे मराठा आरक्षण कसे मिळणार .असा सवाल फारूख अहमद यांनी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी ,वंचित चे नेते नामदेव आयलवाड जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, डॉ. उत्तम इंगोले, तालुकाध्यक्ष सुभाष अलापुरे ,एडवोकेट अविनाश सूर्यवंशी, सय्यद बासीत सह पक्षाचे अनेक पदाधीकारी, ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…