जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः राज्यात सत्ताधारी असलेल्या परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडवा-आडवीच्या राजकारणाला कंटाळून पक्षाकडे राजीनामा देत मोठी खळबळ उडवून दिली होती. तशीच काहीशी आवस्था हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांची नांदेड जिल्ह्यात काँग्रेसकडून होत आहे. मात्र यावर ते मौन धारण आहेत.
प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले, असून ती परंपरा 2019च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिली आहे. मात्र राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नवे समीकरणे उदयास आली. यातून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस असे सरकार स्थापन झाले. एकमेकांविरोधात निवडणूक लढलेल्या या पक्षाने भाजपला रोखण्यासाठी महाआघाडी स्थापन करत या आघाडीचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले.
सरकार म्हणून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र असली, तरी स्थानिक पातळीवर एकमेकांविरोधात उभे असतात. याचा प्रत्यय परभणी जिल्हयातील राजकीय घडामोडीवरून दिसून आला आहे. राष्ट्रवादीकडून अडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या कारणांवरून बंडू जाधव यांनी बंडाचे निशान फ डकाविले. यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. अशीच खदखद खासदार हेमंत पाटील यांच्या बाबतीत बघायला मिळते.
नांदेड दक्षीणचे आमदार असताना हेमंत पाटील यांनी करोडो रुपयांचा निधी या मतदारसंघात आणला. निधी आला कामे झाली. मात्र उद्घाटने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. या भागाच्या विकास करण्यासाठी निधी आणण्याचे काम खर्या अर्थाने हेमंत पाटील यांनी केले. मात्र त्यांना कोणत्याच कार्यक्रमाला बोलविण्यात आले. गृहविभागाची प्रयोग शाळा सुद्धा त्यांच्याच काळात मंजूर झाली. परंतु त्याचे श्रेय सुद्धा काँग्रेसने घेतले. बंडू जाधव यांना परभणीत राष्ट्रवादीचा तर हेमंत पाटील यांना काँग्रेसचा उघड व छुपा विरोध सुरुच आहे. त्यामुळे शिवसेनाचा मुख्यमंत्री असून सुद्धा स्थानिक पातळीवर शिवसेनेचे घुसमट न बघितलेली बरी असेच दिसते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…