जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24:-हिंगोली व नांदेड या दोन्ही जिल्ह्यात काँग्रेसचे पालकमंत्री असल्याने शिवसेनेला योग्य ते प्रतिनिधित्व मिळत नाही.त्यामुळे दोन्ही पैकी एका जिह्यातील पालकमंत्री बदलून त्या जागी शिवसेनेचा पालकमंत्री करण्यात यावा,अशी मागणी करत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी म्हाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर देण्याचा प्रयत्न केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर काँग्रेसची नाराजी असताना इकडे नांदेड व हिंगोली जिल्ह्यात शिवसेना ही काँग्रेसवर नाराज असल्याचे हेमंत पाटील यांनी दाखवून दिले.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संपर्क मंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हेमंत पाटील बोलताना म्हणाले,की यापूर्वी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून विनंती केली,नांदेड किंवा हिंगोली या दोन्ही जिल्ह्यापैकी कुठे तरी शिवसेनेचा पालकमंत्री करावा,त्यासाठी संजय राठोड हे योग्य राहतील,असे कळविले होते.जेणेकरून कुठेतरी शिवसेनेला आधार होईल,
नांदेड येथे अशोक चव्हाण हे पालकमंत्री आहेत,ते सुद्धा शिवसेनेला प्रतिनिधित्व देत नाहीत.इकडे वर्षा गायकवाड या पण शिवसेनेला मदत करत नाहीत.अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांनी कामे करायची तरी कशी असा सवाल हेमंत पाटील यांनी केला.त्यामुळे संजय राठोड हे आमची मागणी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत कळवतील,असा आशावाद हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…