राजकारण

मंत्री डॉ.राऊत यांचा दलित मतदार काँग्रेसकडे वळविण्याचा प्रयत्न;मराठवाडा दौऱ्याची यशस्वी सांगता

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:- राज्याचे ऊर्जा मंत्री तथा काँग्रेस अनुचित जाती-जमाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नितीन राऊत यांनी नुकताच मराठवाड्याचा शासकीय दौरा हा दलित समाजाला पुन्हा काँग्रेसकडे जोडणाचा प्रयत्न म्हणून बघितला जात आहे. या दौऱ्याच्या निमिताने डॉ.राऊत यांचे प्रत्येक जिल्ह्यात झालेले स्वागत आणि दलित समाजाने दौऱ्याच्या निमित्ताने दिलेला प्रतिसाद पाहता कॉंग्रेसपासून विभागलेला दलित मतदार बांधणीसाठी बेरजेचा ठरणार आहे.

 

कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील महाआघाडीच्या कोणत्याच मंत्र्यांना राज्यभर दौरे करता आले नाही.मात्र कोरोनाची लाट ओसरू लागताच अनेक मंत्री राज्यभरात जात आहेत.विदर्भाच्या राजकरणात कायम सक्रिय राहणारे डॉ.नितीन राऊत हे आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेले अभ्यासू नेतृत्व म्हणून संबंध राज्यभर ओळखले जाते.उत्तम प्रशासक अशी राजकारणात छब्बी आहे.यापूर्वी आघाडी सरकारमध्ये ते अनेक वर्षे मंत्री राहिले.

महाआघाडी सरकारमधील काँग्रेसचे ते पॉवरफुल मंत्री असून महाआघाडी सरकारमध्ये सहा मंत्र्यामध्ये त्यांचा शपथविधी झाला होता.हायकमांडकडे त्यांची चांगली प्रतिमा असल्याने त्यांच्याकडे काँग्रेस अनुसूचित जाती व जमाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्षपद कायम आहे.

राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दलित समाज ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचीत बहुजन आघाडीकडे आकर्षित झाला होता.मात्र आज घडीला समाज सैरभैर असून सक्षम पर्याय दलित समाज शोधू लागलो आहे. अशी संधी काँग्रेसकडे चालून आली,असून ही संधी डॉ.नितीन राऊत यांच्या रूपाने काँग्रेस आपली मूळ वोटबँक जोडू पाहत आहे.

विदर्भात नितीन राऊत यांच्या माध्यमातून दलित समाज काँग्रेसकडे वळू लागला असून मराठवाडा ही यास अपवाद राहता कामा नये,यासाठी दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या नितीन राऊत यांनी आंबेडकरी समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे.त्याचसोबत ज्या जिल्ह्यात ते गेले, येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शासकीय बैठक,उदघाटन,कार्यकर्ते संवाद आणि पत्रकार हितगुज केले.

आंबेडकरी समाज कायम परिवर्तन आणि बदलाच्या बाजून उभा राहत असतो,वंचीत बहुजन आघाडी दोन्ही निवडणुकीत अपयशी ठरली.देश पातळीवर भाजप-मोदी संविधानाच्या मूळ गाभ्याला हात घालु पाहत आहे.त्यामुळे भाजपला आव्हान देण्यासाठी कॉंग्रेसच्या रूपाने बदल घडवू पाहत आहे.ही संधी साधत नितीन राऊत यांनी शासकीय दौऱ्याच्या माध्यमातून दलित समाजाला काँग्रेससोबत जोडण्याचा प्रयत्न म्हणून याकडे बघितले जाते.त्याचसोबत महाआघाडी सरकारमध्ये राहून अनुसूचित जाती-जमातीच्या पदोन्नतीमधील आरक्षण हा मुद्दयावर दोन हात केल्यामुळे अनुसूचित जाती व जमातीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गात डॉ.नितीन राऊत यांच्याबद्दल आदराची भावना तयार झाली आहे.त्यामुळे नितीन राऊत हे काँग्रेसमधील दमदार मंत्री आणि दलित समाजाचा सिम्बॉल म्हणून ताकदीने पुढे येत आहेत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago