नांदेड, बातमी24ः- 104 वर्षांचे असलेल्या राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अन्न त्याग केल्यानंतर प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतभर नाव असलेल्या डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रकृतीची नांदेड भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट घेऊन विचारपूस केली होती. यानंतर सोमवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस करून डॉक्टरांशी संवाद साधला.
लातूर जिल्हयातील अहमदपूर येथे वास्तव्य असलेल्या डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे जिवंत समाधी घेणार अशी अफ वा मागच्या आठवडयात उठली होती. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणार्या भक्तांनी भक्तीस्थळाकडे धाव घेतली होती. त्या दरम्यानच्या काळात त्यांनी अन्नत्याग ही सुरु केला होता. या प्रकारानंतर डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना नांदेड येथील काब्दे हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले.
रविवारी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी रुग्णालयात जाऊन डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रकृतीची विचारपूस करत संवाद साधला होता.यानंतर जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा रुग्णालयात जाऊन पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी उपचार करणार्या डॉक्टरांकडून ही माहिती जाणून घेतली.
——
नांदेड-लातूर जिल्हाधिकार्यांकडून विचारपूस
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व लातूर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास काब्दे हॉस्पीटल येथे जाऊन डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…