राजकारण

प्रयोग शाळेच्या श्रेयावरून खासदार हेमंत पाटील हे पालकमंत्री चव्हाणांवर नाराज

जयपाल वाघमारे

नांदेड, बातमी24ःराज्यातील सत्ता बदलानंतर ही कामे मी केली ती कामे आमच्या काळात मंजूर झाली. त्या कामास सर्वाधिक निधी दिला. मावेजा आमच्यामुळे मिळाला.यावरून जिल्ह्यातील बडया नेत्यांमध्ये वाद पेटला आहे. आता असाच वादा पालकमंत्री अशोक चव्हाण व भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पेटण्याची चिन्हे असून न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील डीएनए चाचणी विभाग व संगणक गुन्हे विभागावरून अशोक चव्हाण यांच्यावर खासदार हेमंत पाटील हे नाराजी आहेत. या प्रकरणी अशोक चव्हाणांचा दावा हेमंत पाटील यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला, असून तशी नाराजी त्यांनी बातमी24.कॉम शी संवाद साधताना व्यक्त केली.

दोन दिवसांपूर्वी म्हणजे दि. 20 जुलै रोजी काँग्रेसकडून प्रसिद्धी पत्रका काढण्यात आले. या दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले,की राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांनी रखडलेल्या कामांना वेगाने चालना दिली. अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे नांदेड येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोग शाळेत डीएनए चाचणी विभाग व संगणक गुन्हे विभाग सुरु होणार आहे. हे दोन्ही विभाग सुरु करण्यासाठी पाच हजार चौरफ फु ट जागा डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जागा सुद्धा उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले.

डीएनए चाचणी विभाग व संगणक गुन्हे विभागासाठी जागा देण्याचा प्रयत्न शासनाकडून मान्य झाला, असून लवकर दोन्ही विकास सुरु होतील, असे सांगण्यात आले. यावर आक्षेप नोंदवित खासदार हेमंत पाटील म्हणाले, की ही कामे मंजूर होऊन तीन वर्षे झाली. यासाठी यापूर्वी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून दिलेली आहे.

या मंजूरीसंबंधीचे जुने कागदपत्रे सर्वच उपलब्ध आहे. हे सर्व कामे नांदेड दक्षीण विधानसभा मतदारसंघाचा आमदार असताना यापूर्वीच मंजूर झाले. यात फु कट श्रेय घेण्याचा प्रकार हस्सास्पद असून याबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यासंबधीचे कागदपत्रे सर्व उपलब्ध करून ते दिले जातील,असे त्यांनी बातमी24.कॉम शी संवाद साधतना सांगितले.
——–
अशोक चव्हाण-चिखलीकर मावेजा वाद
इकडे लेंडी धरणाच्या मावेजा वाटपवरून चिखलीकर यांनी या मावेजचा श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फ डविस यांना जाते, असे सांगितले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी काँग्रेसकडून माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या नावे प्रेसनोट प्रसिद्ध करत चिखलीकर यांचा दावा फे टाळण्याचा प्रयत्न झाला. कामाच्या श्रेयावरून सुरु असलेला वाद पुढील काळात अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago