राजकारण

खासदार हेमंत पाटील यांचे साखर कारखान्याचे स्वप्न लवकरच साकार होणार

नांदेड,बातमी24:- बँकिंगच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात उडी घेणाऱ्या करणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांचे साखर कारखानदारीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.

मागच्या वेळी नांदेड दक्षिण आमदार असताना हेमंत पाटील यांनी गोदावरी अर्बन बँकेची स्थापना करून राज्य व राज्याबाहेर ही विस्तार केला आहे,करोडो रुपयांची ठेवी बँकेने उभारली आहे.

बँकिंगकडून सहकार क्षेत्रातील सर्वाधिक महत्व असलेला शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेला साखर कारखाना मिळावा,यासाठी ते सन 2016 पासून प्रयत्नशील होते.

मागच्या काही वर्षांपासून कलंबर सहकारी साखर कारखाना विक्री करण्याचे प्रयत्न जिल्हा बँकेने सुरू केले होते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे या कारखान्यावर 47 कोटी रुपयांचे कर्ज होते.वसुली म्हणून बँकेने हा कारखाना विक्रिस काढला होता.मात्र संचालक मंडळातील काहींनी प्रणव ऑटो या एजन्सीला विक्रीसविरोध केला,त्यामुळे भिजत घोगडे पडले होते.

जिल्हा बँकेच्या आजच्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विक्रीबाबत हिरवा कंदील मिळाला.औरंगाबाद येथील प्रणव ऑटो या एजन्सीचे एकमेव निविदा होती,या एजन्सीने यापूर्वी 2 कोटी रुपये भरले होते.सदरची एजन्सी खासदार हेमंत पाटील यांच्याशी संबंधित आहे.त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून साखर कारखानदारी चालविण्याचे हेमंत पाटील यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.
——–
मागच्या वेळी हुलकावणी
खासदार हेमंत पाटील यांनी हदगाव येथील हुतात्मा सहकारी साखर कारखाना घेण्यासाठी प्रयत्न केले होते.मात्र त्यांना यश आले नव्हते.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago