Categories: राजकारण

खासदार प्रताप पाटील चिखलीकर संतापले…

नांदेड, बातमी24ः- जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे राजशिष्टाचाराचे पालन न केल्यावरून प्रशासनावर संतापले तर पालकमंत्री अशोक चव्हाण हे शासनाच्या मालमत्तेला स्वतःची मालकी असल्याप्रमाणे उद्घाटन करण्याचे प्रकार करत आहेत, अशी टीका खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली.

दोन दिवसांपूर्वी श्री. गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयाच्या दोन खांटाच्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. राजशिष्टाचारानुसार कुठल्याही शासकीय कार्यक्रमाचे रितसर आमंत्रण जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष,महापौर अशा लोकप्रतिनिधींना देणे हा एक प्रशासकीय राजशिष्टाचाराचा भाग असतो.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उद्घाटन सोहळयास सोहळयास खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना आमंत्रण न दिल्याच्या कारणांवरून ते चांगलेच संतापले आहेत. यासंबंधी माध्यमांसमोर बोलताना खंत व्यक्त करताना ते म्हणाले, की पालकमंत्री हे शासकीय स्थाने हे स्वतःची मालमत्ता असल्यासारखे वागत आहेत. तर जिल्हाधिकार्‍यांसोबत पालकमंत्र्यांचे वागणे ही शब्दात सांगणे शक्य नसल्याची टीका केली.

शासकीय भूमिपुजन असो किंवा लोकार्पणच्या कोनशिलावर जिल्हयातील लोकप्रतिनिधींचे नावे असणे अपेक्षीत होते. मात्र पालकमंत्री हे स्वतःचे नाव कोरून घेत आहेत. हे राजशिष्टाचाराला धरून नसल्याचे खासदार चिखलीकर म्हणाले. त्यामुळे मी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाचा निषेध करतो, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपद उपभोगलेल्या माणसाकडून असा प्रकार अपेक्षीत नाही. अशी अपेक्षा ही या वेळी चिखलीकर यांनी व्यक्त केली.

अर्धापुर येथील शासकीय इमारतीचे उद्घाटन ही एकटयाने उरकून घेतले होते. प्रत्येक इमारतीच्या फ लकावर स्वतःचे नाव असावे, असा मोह असा प्रकार अशोक चव्हाण यांनी शंकररावी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात तरी, करू नये, असा सल्ला खासदार चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना दिला.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago