राजकारण

नेतृत्व सांग काम्या सीईओच्या शोधात!

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः- तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या बदलीस चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मागच्या चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेला पूर्णवेळ सीईओ न मिळणे म्हणजे, नांदेडला अधिकारी येण्यास उत्सुक नसावेत किंवा नेतृत्वाकडूनच सांग काम्या सीईओचा शोध सुरु असावा, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे चार महिन्यांपासून जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त असावे.

क्षेत्रफ ळाच्या दृष्टीने राज्यात बलाढया असलेल्या नांदेड जिल्हयाची ओळख आहे. जन्मशताबद्धी वर्षे साजर होत असलेल्या स्व. शंकरराव चव्हाण यांची कर्मभूमी असून स्व. शंकरराव चव्हाण यांच्यामुळे नांदेडची ओळख राज्यच नव्हे तर देशपातळीवर घेतली जाते. या जिल्ह्याला मोठी राजकीय व प्रशासकीय परंपरा लाभल्याचा इतिहास आहे. मोठ नेतृत्व लाभलेल्या जिल्ह्यात काम करणार्‍यांसाठी अधिकारी क्षणात तयार होत असत. परंतु अलिकडच्या काही वर्षांमध्ये अधिकार्‍यांना नांदेडमध्ये काम करण्याविषयी इट आल्याचे दिसून येते. विशेषः म्हणजे औरंगाबादनंतर सर्वाधिक दळण-वळणाच्या सुविधा नांदेडमध्ये असून ही नांदेडला येण्यास अधिकारी उत्सुकता दाखवित नाही. याबाबत नेतृत्वाने सुद्धा विचार करणे आवश्यक आहे.

नांदेडवरून एखाद्या अधिकार्‍याची बदली झाल्यानंतर नवा अधिकारी आणणे सर्वाधिक जोखीमीचे नाव होऊन बसते. वाढता राजकीय हस्तक्षेप, मुक्तपणे काम करण्यास येणार्‍या अडचणी पाहता अधिकार्‍यांमधून नांदेड नको रे बाबा अशीच परिस्थिती झाली आहे. नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद चार महिन्यांपासून रिक्त आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. शरद कुलकर्णी यांच्याकडे पदभार आहे. कुलकर्णी यांच्याही अनियमिततेच्या भानगडीत दिवसाकाठी समोर येत आहेत.

अशा परिस्थितीमध्ये पूर्णवेळ जिल्हापरिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी आणणे आवश्यक असताना प्रभारीवर चलावू कारभार सुरु आहे. किनवट आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक आयएएस अधिकारीअभिनव गोयल हे जिल्हापरिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून येथील अशी अटकळ बांधली जात होती. परंतु दि. 14 जुलै रोजी त्यांची लातूर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली. जिल्ह्यात काम केल्याचा गोयल यांचा चांगला अनुभव होता. शिवाय कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. नेतृत्वाने मनात घेतले असते, तर गोयल हे नांदेड जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून येणे अशक्य नव्हते.

नेतृत्वाने मनावर घेतल्यास कधीही सीईओ म्हणून आदेश निघू शकतात. शेकडो अधिकारी आहेत. त्यातून कुणालाही निवडले जाऊ शकते. तसे नेतृत्वाकडून मनावर घेतले जात नसल्याचे बघायला मिळत आहे. कदाचित कुणी सांग काम्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिळतो काय? याचा शोध सुरु असून तो आतापर्यंत लागला नसाव. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे आदेश निघायला विलंब लागत असावा, असा अंदाज बांधला जात आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago