जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः जिल्ह्याच्या राजकीय शाळेचे हेडमास्तर तसेच सुप्रिमो अशोक चव्हाण आहेत,हे कुणीही नाकारू शकत नाही. मात्र काँग्रेस पक्षात ग्रामीण जिल्हाध्यक्ष सांग कामे किंवा नावापुरतेच नामधारी असल्याचे आतापर्यंत बघायला मिळाले आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण जिल्हाध्यक्षांपेक्षा महानगराध्यक्षांची जिल्ह्यावर मोठी पक्कड आहे.
दीर्घकाळ जिल्हाध्यक्षपदावर राहण्याची संधी मिळालेल्या बी.आर. कदम यांच्यानंतर मुदखेड तालुकाध्यक्ष राहिलेल्या गोविंद पाटील नागेलीकर यांची निवड झाली. त्यांना सुद्धा अध्यक्ष होऊन तीन ते चार वर्षे होत आले आहेत. त्यांच्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध नगरापालिका व लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत पक्ष पदाधिकार्यांपेक्षा अशोक चव्हाण यांनाच कष्ट घ्यावे लागले.
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकार्यांनी पक्ष बांधणी व लोकांमध्ये सतत वावरले असते. तर अशोक चव्हाण यांना पराभवाचे तोंड पाहण्याची वेळ आली नसती. त्यातली-त्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर यांना अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्षाचे मेळावे, शाखा स्थापना किंवा ग्रामीण भागातील इतर पक्षामधल मजबूत कार्यकर्ता फ ोडून काँग्रेसमध्ये आणल्याचे कधीही आठवत नाही.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून ते नित्याने जिल्हा पक्ष कार्यालयात पगारी कर्मचारी असल्यासारखे येऊन बसत. पक्ष कार्यालयात बसून कधीच वाढत नाही. जनतेत जाऊन, त्यांचे कामे करून वाढत असतो. कदाचित नागेलीकर यांचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असून ही हात बांधलेले असावेत, वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यापलिकडे रेघ सुद्धा ओढायची नाही, असा आदेश असावा, त्यामुळे ते त्यापुढे कधी जात नसावे.
——
महानगराध्यक्षांची जिल्ह्यावर पक्कड
काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर यांच्यापेक्षा महानगरध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर यांची अशोक चव्हाण यांच्यानंतर पक्षात दुसर्यानंबरचे स्थान आहे. त्यांच्याकडे महानगराध्यक्ष पद असले, तरी जिल्हाभरात पक्षाच्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून असतात. ग्रामीण जिल्हाध्यक्ष नामधारी असले, तरी महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर हे पूर्णवेळ सक्रिय व निर्णय प्रक्रियेत असतात.
——-
नागेलीकरांची राजकीय पत ढासाळली
गोविंद पाटील नागेलीकर यांना जिल्ह्याच्या राजकारणावर तिळमात्र ठसा उमटविता आलेला नाही. उलट पंचायत समिती सभापतीने वंचितमध्ये प्रवेश केल्याची साधी भनक सुद्धा लागू शकली नाही. त्यांच्या तालुक्याचा सभापतीचा प्रवेश म्हणजे, नागेलीकर यांची तालुक्यात राजकीय पत नसल्याचे समोर आले होत
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…