नांदेड, बातमी24ः- भौगोलिक दृष्टया निसर्गाच्या कृपने नांदेड शहराला दोन नद्यांचा वारसा लाभलेला आहे. शहराच्या मद्योमध वाहनारी गोदावरी नदी तर उत्तर दिशेने आसना नदी वाहत असते. या आसना नदीवरील सांगवी बंधार्यास श्रीमती कुसुमताई शंकरराव चव्हाण जलाशय असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे नगरसेवक बापुराव गजभारे यांनी केली आहे.
गोदावरी व आसना या दोन्ही नद्या नांदेड शहराची तहान भागविण्याचे काम करतात. या नद्यांमुळे शेतीला मुबलक पाणी मिळत असल्याने सर्व भाग सुजलम व सुफ लम झाला आहे. स्व. शंकरराव चव्हाण यांनी विष्णुपुरी प्रकल्प ही आशिया खंडातील पहिली उपसा जलसिंचन योजना गोदावरी नदीवरील असर्जन येथे निर्माण केली. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती व उद्योगांना पाणी मिळत राहिले आहे.
स्व. शंकरराव चव्हाण यांच्या यशस्वी कारकिर्दीच्या भागीदार त्यांच्या अर्धागिंनी श्रीमती कुसुमताई चव्हाण यांचे योगदान मोठे आहे. स्व.शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षे सुरु आहे. या निमित्ताने श्रीमती कुसुमताई चव्हाण यांचे नावे आसना नदीवरील बंधार्यास देऊन गौरव करण्यात यावा.असा प्रस्ताव बापुराव गजभारे यांनी महानगरपालिकेकडे सादर केला आहे. या प्रस्तावाचे अनुमोदक दयानंद वाघमारे हे आहेत. त्यामुळे नांदेड-वाघाळा महानगर पालिकेने प्रस्ताव मंजूर करून यासंबंधी परवानगी घ्यावी, अशी मागणी गजभारे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे केली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…