राजकारण

महाआघाडीतील सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी जिल्ह्यात आस्तित्वहीन

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः सत्तेच्या सोपानापर्यंत मजल मारलेल्या भाजपचा वारू उधळून लावणार्‍या महाविकास आघाडीत महत्वाची भूमिका वठविणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला नांदेड जिल्ह्यात मात्र राज्यात सत्ता असून ही फ ारसे असे काही आस्तित्व राखता आलेले नाही. हे दोन्ही पक्ष जिल्हयाच्या राजकारणात आस्वित्वहीन झाल्याचे दिसून येत आहे.

सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप 120 जागा जिंकून संगळया मोठा पक्ष ठरला. शिवसेना सुद्धा भाजपसोबत युती करून लढली. मात्र अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेचे भाजपसोबत पुढे जमू शकले नाही. त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले. तर राजकारणात काहीही होऊ शकते, याची प्रचिती महाराष्ट्राच्या राजकारणात घडली. यातून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी अनपेक्षीत आघाडीने सरकार स्थापन केले.

पाच वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या पक्षांतरामुळे पोरखलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत सत्तेत जाता आले. सत्तेमधील पक्षांना जिल्हापातळीवर पक्ष वाढविण्याची संधी मिळत असते. मागच्या पाच वर्षांमध्ये भाजपने सत्तेच्या जोरावर पक्षाचा विस्तार चांदापासून ते बांधापर्यंत केला. तर मागच्या पाच वर्षांमध्ये पक्षांतरांचा सर्वाधिक फ टका काँग्रेस व राष्ट्रवादीला सोसावा लागला. ही आपत्ती नांदेड जिल्ह्यातील या दोन्ही पक्षांवर ओढावली होती. या दोन्ही पक्षांमधील दिग्गज मंडळींनी भाजपचे दार ठोठावले.

या वेळी योगा-योगाने सत्ता येऊन ही नांदेड जिल्ह्यात काँग्रेस वगळता शिवसेना व राष्ट्रवादीला पुनर्रबांधणी करता आलेली नाही.राष्ट्रवादीला अद्याप ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडता आलेला नाही. मागच्या वेळी तीन आमदार निवडून देणार्‍या शिवसेनेला नांदेड उत्तरमधून बालाजी कल्याणकर यांच्या रुपाने लाज राखता आलेली आहे. मागच्या वेळी राष्ट्रवादीचा किनवट मतदारसंघातून एकमेव प्रदीप नाईक आमदार होते. या वेळी ते सुद्धा निवडून येऊ शकले नाही.

आजच्या तारखेत राज्याच्या सत्तेतील विशेष म्हणजे, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना सुद्धा जिल्हयातील शिवसेना कागदावर सुद्धा दिसत नाही. तीन-तीन जिल्हा प्रमुख असून प्रशासकीय राजकीय पातळीवर शिवसेनेची ओळख निर्माण करून शकले नाही.राष्ट्रवादी नावाचा पक्ष नांदेड जिल्ह्यात कुठेही दिसत नाही. तितक्या दैयनिय आवस्थेत म्हणजे, कोम्यात गेला की काय ?अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना काँग्रेसकडून मिळेल त्यावर समाधान माणून दिवस मोजावे लागत आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago