राजकारण

लॉकडाऊन विरोधात हा राजकीय पक्ष रस्त्यावर उतरणार

नांदेड,बातमी24ः– प्रशासनाकडून कोवीड-19 च्या निमित्ताने जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या विरोधात वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्यात येत्या 10 ऑगस्टपासून लॉकडाऊन उधळून लावणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी दिला.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन उधळून लावण्याची भूमिका घेतल्याचा पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात वंचित तर्फे प्रशासनाला हा इशारा देण्यात आला आहे. कोवीड-19 कोरोना प्रादुर्भावाच्या नावाखाली नांदेड जिल्ह्यात प्रशासनाने प्रचंड गाजावाजा केला. यासंदर्भात वारंवार वंचित बहुजन आघाडी तर्फे नम्रपणे करण्यात आलेल्या सूचनांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या या पोटतिडकीच्या मागणीकडे प्रशासनाने अक्षरश: दुर्लक्ष केले. रोजमजुरांवर उपासमारीचे संकट कोसळले; आणि दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात दोन कामगारांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याला जिल्हा प्रशासन नाही तर जबाबदार कोण ? असा सवालही इंजि. प्रशांत इंगोले यांनी उपस्थित केला आहे.

कोवीड…कोवीडच्या नावे चिवचिवाट करण्यापेक्षा प्रशासनाने जिल्ह्यात तातडीने जनजीवन पूर्वपदावर आणण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे या निर्णयाविरोधात येत्या 10 ऑगस्टपासून रस्त्यावर उतरण्याचा इशारा इंजि. प्रशांत इंगोले यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago