नांदेड,बातमी24:-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार वसंत चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर यांची बिनविरोध निवड झाली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पुरस्कृत समर्थ विकास पॅनलने 17 जागेवर विजयी मिळवित बहुमत मिळविले.यात काँग्रेस 12,राष्ट्रवादी 4 व शिवसेना 1 तर भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या.
शुक्रवार दि.16 रोजी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणुकीमध्ये एकमेव वसंत चव्हाण व भोसीकर यांचे एकमेव अर्ज दाखल झाले.त्यामुळे ही निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे वसंत चव्हाण यांच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरुवातीपासून सुरू होती,उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी की शिवेसेनेकडे जाणार याकडे लक्ष लागले होते.काँग्रेससोबत जवळीक साधून राहीलेल्या भोसीकर यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली.यावेळी भाजपच्या चार ही संचालकांनी गैरहजेरी लावली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…